राज्यस्तरीय प्रगतिशील आदिवासी साहित्य संमेलन राजूर उत्सवात

राजुर/प्रतिनिधी

प्रगतिशील लेखक संघ अकोले तालुका द्वारा आयोजित दुसरे राज्यस्तरीय प्रगतिशील आदिवासी साहित्य संमेलन राजूर येथे ऍड. देशमुख  महाविद्यालय येथे कॉम्रेड बी. के. देशमुख साहित्य नगरीत आणि दिवंगत कवी संतोष मुठे विचार मंचावर  झाले.


संमेलनाचे उद्घाटन प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले. अनिष्ट रूढी परंपरा यांची पोस्टर यांची होळी करून या प्रगतिशील साहित्य संमेलनाचे उद्घाटन अभिनव पद्धतीने करण्यात आले. प्रगतिशील लेखक संघाच्या 90 वर्षाच्या पुरती निमित्ताने विशेष संमेलनाचे आयोजन येथे करण्यात आले होते .यावेळी आपल्या अध्यक्ष मनोगतातून कथाकार संजय दोबाडे यांनी अत्यंत मुलगामी प्रश्न येथे उपस्थित केले. मशाल मोर्चाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी ग्रंथ दालनाचे उद्घाटन सी पी आय चे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे यांनी केले तसेच कॉ. बी के देशमुख साहित्य नगरीचे उद्घाटन महिला फेडरेशनचे अध्यक्ष स्मिता पानसरे यांनी केले यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे आयकर आयुक्त मुरलीधर बांडे उपस्थित होते.  ज्यामध्ये अकोले तालुक्याचे भूमिपुत्र असणारे जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या नव्या विचार वाटा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच कवी सुनील भोसले यांच्या वादळी किनार या काव्यसंग्रहाचे सुद्धा यावेळी प्रकाशन झाले.


उद्घाटनाच्या मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कसबे यांनी सध्या कालीन राजकारण धर्म संस्कृती आणि प्रथा परंपरा यांचा आढावा घेताना वैदिक संस्कृती आणि बहुजन संस्कृती याच्यातील फरक औषध करून कोणती मूल्य प्राकृतिक आणि प्रगतिशील आहेत हे स्पष्ट करून सांगितले. उद्घाटन क्षेत्रासाठी महाराष्ट्राचे लोककवी प्रशांत मोरे यांची उपस्थिती होती त्यांनी सादर केलेल्या कवितांना श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. दुपारी दुसऱ्या सत्रामध्ये आदिवासी संस्कृतीचे मारेकरी कोण हा अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा असा परिसंवाद नगर येथील प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ .बापू चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

सहभागी वक्त्यांमध्ये नितीन तळपाडे यांनी आदिवासींचे जीवन विदारक असल्याचे तसेच जल जंगल संपत्तीचे प्रश्न बिकट असल्याची वस्तुस्थिती या ठिकाणी मांडली आम्हाला भाषा पोशाख बोली यांची आदिवासींना लाज वाटते असे सांगून त्यांनी वारू सोनवणे यांची कविता उद्भूत केली. प्रमोद अहिरे यांनी परिसंवाद सहभाग घेताना मारक आणि मारेकरी या शब्दांमधला फरक विषद केला चोरी गुन्हे भीक मागणे आत्महत्या हुंडा पद्धत यामध्ये आदिवासी दिसत नाही असे निरीक्षण नोंदवले   हनुमंत उबाळे यांनी मजुरांच्या प्रश्नाबाबत आणि वनसंपत्तीचा प्रश्न आणि त्यावरील उपाय याबाबत विवेचन केले त्याचबरोबर सांधणचे राज्याचे अध्यक्ष सोमनाथ कातकाडे यांनी संस्कृती या शब्दाचा व्यापक अर्थ असल्याचे प्रतिपादन केले  यावेळी झालेल्या परिसंवादामध्ये कादंबरीकार तुकाराम चौधरी यांनी मानवी उत्क्रांतीचे सर्व टप्पे विशद करत विविध धर्मांमध्ये माणूस कसा जन्माला आला याच्या ज्या वेगवेगळ्या कल्पना सांगितल्या आहेत त्या सर्व कशा अंधश्रद्धांवर आधारित आहेत हे विवेचन केले आणि संस्कृतीच्या अंगाने आणि इतिहासाच्या अंगाने नव्याने मांडणी होण्याची गरज प्रतिपादन केले.

राजू ठोकळ यांनी आदिवासी संस्कृती संपलेली नाही असे विधान केले तसेच नव्याने मांडणी होण्याचे गरज असल्याचे प्रतिपादन केले. आपल्या अध्यक्षीय समारोप मध्ये डॉ.बापू चंदनशिवे यांनी अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे मांडली. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये सर्व आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये छोटी छोटी देवळे मंदिरे पारायण कीर्तने ही जे सुरू झाली आहेत ती खऱ्या अर्थाने आदिवासी संस्कृती वरील आक्रमण आहेत. यावेळी आ.डॉ किरण लहामटे , अमित भांगरे यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी सावळे यांनी केले तर समन्वय विशाल पोटिंदे यांनी केले. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Visits: 72 Today: 4 Total: 1103448

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *