आशिर्वाद पतसंस्थेची वार्षिक ३७ वी सर्व साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

संगमनेर

आशिर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेचे वार्षिक ३७ वी सर्व साधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ढोले पाटील लॉन्स (ऑर्चीड हॉल) मध्ये संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब ताजणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेस पावसाळी वातावरण असतानाही सभासदांची चांगली उपस्थिती होती व सर्वानी चांगला सहभाग घेतला.

सभासद प्रशिक्षणाने सभेस सुरुवात झाली. श्री. तोतरे साहेब यांनी मार्गदर्शनपर पोटनियम, संचालकांची जबाबदारी तसेच सोबत सर्व सभासदांची कर्तव्य या विषयांवर विस्तृत समालोचनपर माहिती दिली.सभेची सुरवात अध्यक्षीय सूचनेने सुरवात झाली. अध्यक्षीय सूचना संचालक श्री. अरुण हिरे यांनी मांडली व अनुमोदन श्री. राजेश ढोले यांनी दिले. प्रथम संस्थेचे अध्यक्ष व सभेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब ताजणे यांनी सर्वांचे स्वागतपर भाषण केले. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये संस्थेच्या प्रगतीचा आढावा त्यांनी मांडला.

यावेळी बाळासाहेब ढोले, नितीन अभंग, गजेंद्र अभंग, अतुल अभंग, विजय डाके, सुभाष पावबाके, एन. एम. मंडलिक, सुधाकर ताजणे, कैलास घोडेकर आभार व्हा. चेअरमन सौ. रुपाली मेहेर यांनी केले. यावेळी संचालक अरुण ताजणे, अरुण हिरे, अरुण पुंड, रामनाथ अभंग, विलास मंडलिक, राजेश ढोले, सोमनाथ अभंग, सिताराम अभंग, धनंजय डाके, रविंद्र पावबाके, सुनिल दाभाडे, बाळासाहेब दासरी, सौ. अर्चना चिपाडे, बाळासाहेब गड़गे, क्रांती घोडेकर यांच्यासह सभासद बाळसाहेब ढोले, सुधाकर ताजणे, एन. एम. मंडलिक, डॉ. सुभाष मंडलिक, रामदास पावबाके, अजित ताजणे, संपत गलांडे, शाम अभंग, रामनाथ कुन्हे, संतोष मेहेर, अंकुश अभंग, अतुल अभंग, अशोक ताजणे, संजय मेहेर, शरद बटवाल, संदिप मंडलिक, सुनिल हिरे, शिवाजी घोडेकर, कैलास घोडेकर, विजय डाके हे उपस्थित होते.

Visits: 66 Today: 1 Total: 1107378

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *