साईबाबांच्या दर्शनाने मनाला समाधान : झहीर खान

नायक वृत्तसेवा, शिर्डी
लहानपणापासून मी साईबाबांचा भक्त आहे. त्याकाळी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत यायचो. पूर्वी दर्शनाची व्यवस्था वेगळी होती. मंदिराजवळ छोटी दुकानं असायची. आता साईबाबांच्या दर्शनाच्या व्यवस्थेत मोठा बदल झालेला आहे. आज साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाला समाधान मिळाले असल्याचे प्रतिपादन भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने केले.

श्रीरामपूरचा सुपुत्र माजी क्रिकेटर झहीर खान याने काल शुक्रवारी पत्नी सागरिका घाटगे, मुलगा फतेहसिंह खान आणि सासू अपेक्षा यांच्यासह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर झहीर खान व त्याच्या कुटुंबीयांचा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई शाल व साईबाबा मूर्ती देऊन सत्कार केला.येत्या मंगळवार दि. ७ ऑक्टोबरला झहीर खानचा वाढदिवस असून त्याआधी त्यांने शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे सहकुटुंब दर्शन घेतले.साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डीत १०७ वा साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवानिमित्त झहीर खान याने सहकुटुंब शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले. यावेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याशी चर्चा करताना झहीर खान म्हणाला, माझं मूळ गाव श्रीरामपूर असून लहानपणापासून मी साईबाबांचा भक्त आहे. त्याकाळी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत यायचो. पूर्वी दर्शनाची व्यवस्था वेगळी होती. मंदिराजवळ छोटी दुकानं असायची. आता साईबाबांच्या दर्शनाच्या व्यवस्थेत मोठा बदल झालेला आहे. आज साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाला समाधान मिळाले.

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने शुक्रवारी सहपरिवार शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर झहीर खान याने सपत्नीक साईबाबा संस्थानच्या देणगी कार्यालयात जाऊन मेडिकल फंडासाठी तब्बल पाच लाखांची देणगी दिली.

Visits: 57 Today: 2 Total: 1112827
