संघाच्या शताब्दी निमित्त शहरातून संचलन 

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
विजयादशमीच्या निमित्त गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संगमनेर शहरात संचलन करण्यात आले. २०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असल्याने स्वयंसेवकांमध्ये उत्साह पहायला मिळाला.
संगमनेर नगरपरिषदेच्या क्रीडा संकुलापासून संचलन सुरू झाले. यावेळी शस्त्र पूजन आणि बौद्धिक कार्यक्रम पार पडला. आमदार अमोल खताळ हे देखील संचलनात सहभागी झाले होते. प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.जगन्नाथ वामन, तालुका संघचालक सुभाष कोथमिरे, तालुका कार्यवाह अक्षय थोरात यांसह मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्य चौक, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मेनरोड, तेलीखुंट, चंद्रशेखर चौक, रंगारगल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक या मार्गे संचलन शारदा शिक्षण संस्थेच्या प्रांगणात नेत तेथे समारोप करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून स्वयंसेवक संघाचे कुटुंब प्रबोधन संयोजक प्रसाद बानकर यांचे बौद्धिक झाले.
Visits: 77 Today: 4 Total: 1102469

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *