कोरोनाने ‘मानवता हाच खरा धर्म’ असल्याची जाणीव करून दिली ः फा.शिनगारे संगमनेर तालुक्यातील सर्व चर्चमध्ये साध्या पद्धतीने ख्रिस्त जयंती उत्साहात साजरी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जगामध्ये कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, या परिस्थितीने खर्‍या अर्थाने मानवाला विचार करायला भाग पाडून ‘मानवता हाच खरा धर्म’ असल्याची जाणीव करून दिली असल्याचे प्रतिपादन सेंट मेरी धर्म ग्रामप्रमुख फा.सायमन शिनगारे यांनी शुक्रवारी (ता.25) केले. ख्रिस्त जयंतीनिमित्त भाविकांना धार्मिक विधीतून संदेश देताना ते बोलत होते.

पुढे बोलताना फा.शिनगारे म्हणाले, नाताळ सण हा समजून घेतला तर कोणत्याच वाईट प्रथांचे अतिक्रमण होणार नाही. प्रेम, दया, शांतीचा संदेश देणार्‍या या ख्रिस्त जन्मदिनी राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन केले. कोरोना महामारीमुळे सेंट मेरी चर्च, मॅथोडिस्ट चर्च बरोबरच तालुक्यातील सर्वपंथीय चर्चमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून ख्रिस्त जयंती सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून ढासळलेली आर्थिक घडी विस्कळीत झालेले सर्वसामान्यांचे जीवन पुन्हा सुरळीत व्हावे यासाठी सेंट मेरी चर्च धर्मग्राम प्रमुख फा.सायमन शिनगारे, पीटर खंडागळे, ऑल्विन जोशी, विकास संगमे, शिवाजी लांडगे, शरद शेळके, दीपक शेळके, अमोल साळवे, विजय दारोळे आदिंनी आपापल्या चर्चमध्ये प्रार्थना केली.

यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले, प्रा.बाबा खरात, रंगकर्मी नाट्य संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब घोडके, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, राजेंद्र गायकवाड, अरविंद सांगळे, प्रशांत यादव, सचिन मुंतोडे, सुहास गायकवाड, अ‍ॅड.अरविंद राठोड, अ‍ॅड.सुहास दुशिंग, विजय आढाव, अ‍ॅड.विजय पगारे, कैलास भोसले, सत्यानंद कसाब, सनी गायकवाड, अजित पाटोळे, मायकल कोपरे, बाळासाहेब भोसले, प्रभाकर जगताप, सिमोन रुपटक्के, सुखदेव शेळके, जयंत जाधव, बाळू वैराट आदिंनी चर्च संलग्न सामाजिक उपक्रमाद्वारे ख्रिस्त जयंती सर्व नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने साजरी केली.

Visits: 175 Today: 1 Total: 1102274

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *