शिर्डीत राज्यस्तरीय नाभिक वधू-वर-पालक मेळाव्याचे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येत्या ८ डिसेंबर रोजी साईंच्या शिर्डीत राज्यस्तरीय नाभिक वधू-वर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे, प्रदेश कार्याध्यक्ष किरण बिडवे आणि प्रा. सुभाष लिंगायत यांनी दिली.

श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या पावन भूमीत समाज बांधवांच्या सहकार्याने २ वर्षांपूर्वी राज्यात सर्वात मोठा राज्यस्तरीय वधु-वर-पालक मेळावा उत्साहात पार पाडला होता. त्याच धर्तीवर येत्या ८ डिसेंबर २०२५ रोजी शिर्डीतच राज्यस्तरीय नाभिक वधू-वर-पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. पूर्वीही राज्यातील सर्वस्तरातील पदाधिकारी व समाज बांधवांनी मोठ्या उत्साहाने राज्यातील विविध भागातून वधु-वरांची नोंदणी केली होती आणि याही वेळेस ते भरभरून सहकार्य करतील अशी अपेक्षा ठेवून राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे, प्रदेश कार्याध्यक्ष किरण बिडवे, प्रदेश संघटक प्रा.सुभाष लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ आयोजित वधु-वर मेळाव्यास सर्वांनी सहकार्य करून मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ अहिल्यानगर जिल्हा, सर्व पदाधिकारी व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
विवाहइच्छूक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी २ ऑक्टोंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत करावी असे आवाहन साईभक्त मनोज वाघ यांनी केले आहे.

Visits: 69 Today: 3 Total: 1104939
