सोमवारी थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवार दि.६ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कांचन थोरात यांच्या शुभहस्ते, माजी आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सत्यजीत तांबे, ॲड.माधव कानवडे, डॉ.जयश्री थोरात यांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी दिली.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात ८ लाख मॅट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप केले आहे. शेतकरी,सभासद, कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक या सर्वांचा थोरात कारखान्यावर मोठा विश्वास असून या कारखान्याने यावर्षी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना सातत्याने सर्वाधिक भाव दिला आहे.

वर्ष २०२५ – २६ या गळीत हंगामाच्या सोमवारी कारखान्याचे संचालक सतीश चंद्रभान वर्पे व त्यांच्या पत्नी सुनिता सतीश वर्पे, रामदास लक्ष्मण धुळगंड व त्यांच्या पत्नी इंदु रामनाथ धुळगंड, रामनाथ बाळाजी कुटे व त्यांच्या पत्नी अलका रामनाथ कुटे, गुलाब सयाजी देशमुख व त्यांच्या पत्नी उज्वला गुलाब देशमुख, अरुण सोन्याबापु वाकचौरे व त्यांच्या पत्नी विद्या अरुण वाकचौरे यांच्या शुभहस्ते सपत्नीक बॉयलर अग्निप्रदीपन पूजा होणार आहे. या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्व शेतकरी, ऊस उत्पादक व सभासद यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

Visits: 55 Today: 3 Total: 1105628
