पन्नास लाखांच्या निधीतून आवजीनाथबाबा भक्त निवास : आ. तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्रीक्षेत्र आवजीनाथ बाबा हे महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येणाऱ्या नागरिकांची व भाविकांची चांगली सुविधा व्हावी याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ५० लाख रुपये निधीतून अद्यावत असे भक्तनिवास उभे करण्यात आले असून ते भाविकांच्या सेवेसाठी सुरू झाले असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये ५० लाख रुपये निधीतून उभारलेल्या अद्यावत भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात, देवस्थानचे अध्यक्ष चंदू करपे आदींसह लोहारे, मिरपुर येथील स्थानिक ग्रामस्थ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. सत्यजित तांबे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात आला आहे. याचबरोबर अद्यावत सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. सर्व तीर्थक्षेत्रांचे सुशोभीकरण केले आहे. आवजीनाथ बाबा हे महाराष्ट्रातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. उत्तर महाराष्ट्रातून त्याचप्रमाणे मराठवाड्यातून अनेक भाविक भक्तगण या ठिकाणी दर्शनाला येतात या सर्वांना चांगली सुविधा व्हावी याकरता बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विकास योजनेअंतर्गत ५० लाख रुपये निधीतून येथे अद्यावत असे भक्तनिवास बांधण्यात आले आहे. हे भक्त निवास भाविकांसाठी उपयोगी राहणार असून यापुढील काळातही सुशोभीकरणासह विविध कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू असे ते म्हणाले.

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, प्रत्येक विजया दशमीला बाळासाहेब थोरात हे अवजीनाथ बाबांच्या दर्शनासाठी नेहमी येतात. लाखो भक्तांसह बाळासाहेब थोरात यांचे लोहारे येथील आवजीनाथ बाबा हे श्रद्धास्थान असून मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी सातत्याने निधी दिला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा करून ५० लाख रुपयांचा निधी मिळवला असून त्यामधून उभे राहिलेले हे भक्तनिवास आदर्शवत ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच बरोबर निळवंडे पाण्यामुळे या परिसरामध्ये समृद्धी आली असून नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी केली.

यावेळी आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्री थोरात यांचा देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला तर सर्वांच्या हस्ते श्री.आवजीनाथ बाबांची आरती करण्यात आली. यावेळी लोहारे, मिरपुर परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 84 Today: 2 Total: 1112252
