खरीप पिकांच्या नुकसानीचे ‘सरसकट’ पंचनामे करा : कांदळकर 

नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे 
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे सहित परिसरात भीज पावसाने सोंगणीस आलेल्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने खरीप पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तळेगाव दिघे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी केली आहे.

यासंदर्भात  कांदळकर यांनी म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात मध्यंतरी दोन-तीन दिवस भीज पाऊस झाला. दरम्यान बाजरी, सोयाबीन, मका यास अन्य खरीप पिके सोंगणीस आलेली होती. मात्र, भीज पावसाने खरीप हंगामातील पिके शेतातच सडून गेली. खरीप पिकांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. सध्या महसूल विभागामार्फत मात्र, ठराविक ठिकाणीच बाजरी, सोयाबीन, मका यासह अन्य पिकांचे पंचनामे केले जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. भीज पावसाने नुकसान झालेल्या खरीप पिकांचे प्रशासनाने सरसकट पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी केली आहे.
Visits: 69 Today: 4 Total: 1113917

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *