वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण अतिशय उत्साहात पार पडले. या प्रशिक्षणामध्ये तब्बल १८०० शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

उत्कृष्ट नियोजनामुळे यशस्वी प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेरचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर व जिल्हा प्रशिक्षण समन्वयक तथा वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रभावीपणे पार पडले. प्रत्येक केंद्र समन्वयकांच्या समन्वयातून प्रशिक्षणाची मांडणी, नियोजन व आयोजन उत्कृष्टरित्या पार पडल्याचे समाधान शिक्षकवर्गातून व्यक्त करण्यात आले. सर्व प्रशिक्षणार्थींना तालुका निहाय प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले.

प्रशिक्षणाची संपूर्ण मांडणी व नियोजन अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल शिक्षक भारती संघटनेच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. प्रशिक्षण उपक्रमादरम्यान शिक्षकांच्या हिताचा विचार करून संघटनेने सक्रिय सहकार्य दिल्याने सर्व शिक्षकांत समाधानाची भावना निर्माण झाली. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांचे ज्ञान, अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांशी असलेले शैक्षणिक नाते अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

यावेळी शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे,विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, महिला जिल्हाध्यक्षा रूपाली कुरुमकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, संघटक चंद्रशेखर हासे,सहसचिव राहुल कानवडे ,तालुका अध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, साई थोरात,संपत वाळके,नानासाहेब खराडे, रूपाली बोरुडे, मफीज इनामदार,दीपक फापाळे,गणपत धुमाळ,विजय पांडे, अमोल तळेकर,संतोष नवले,बाबासाहेब तांबे,अकील फकीर,बाबाजी लाळगे,वैभव चोथे,प्रवीण मालुंजकर,श्याम जगताप, आदी सर्व पदाधिकारी यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे आभार मानले.

Visits: 215 Today: 6 Total: 1108786
