सह्याद्री ॲग्रोव्हेटचा पुढाकार; पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात 

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधवांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे, घरांचे, जनावरांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे या भागातील लोकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. यासाठी संगमनेरच्या सह्याद्री  ॲग्रोव्हेटने पुढाकार घेतला असून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देऊ केला आहे.
अतिवृष्टीमुळे दीपावलीसारख्या सणासुदीच्या काळातही अनेक कुटुंबे आपल्या संसारापासून, घरापासून वंचित झाली आहेत. या परिस्थितीत केवळ सरकारकडून मदतीची अपेक्षा न करता समाजातील प्रत्येकाने एकत्र येऊन या पुरग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. याच सामाजिक जाणिवेतून सह्याद्री ॲग्रोव्हेटने मदतीचा पुढाकार घेतला आहे. कंपनीकडून या भागातील हजारो पुरग्रस्त कुटुंबांना ब्लॅंकेट आणि बिस्कीट वाटप करून मदत करण्यात आली आहे.
सह्याद्री ॲग्रोव्हेटने यापूर्वीही सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुरग्रस्तांसाठी मदतकार्य केले होते. शेतकऱ्यांच्या योगदानामुळेच आज कंपनी उभी आहे, ही जाण ठेवूनच हे मदतकार्य हाती घेण्यात आले आहे.
शेतकरी आणि ग्रामीण बांधव हेच आमचे खरे बळ आहे. त्यांच्या अडचणीत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे सामाजिक कर्तव्य असल्याचे सांगत सह्याद्री ॲग्रोव्हेटने  पुरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे.
Visits: 450 Today: 1 Total: 2123811

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *