व्हाईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमला आयएसओ मानांकनाचा सन्मान

नायक वृत्तसेवा, मुंबई
जगभरात पत्रकारितेच्या आणि समाजकारणाच्या क्षेत्रात भक्कम कामगिरी करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया आणि
व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम या दोन संस्थांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन मिळाले आहे. हा सन्मान म्हणजे दोन्ही संस्थांच्या प्रामाणिक कामगिरीची, दर्जेदार उपक्रमांची आणि सातत्यपूर्ण प्रगतीची पावतीच आहे.

‘लोकशाहीचे खरे प्रहरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हाईस ऑफ मीडियाने राज्यापासून देशभर आणि आता जागतिक स्तरावर पत्रकारांच्या प्रश्नांना आवाज दिला. तर व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमने देशोदेशीतील पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. या दोन्ही संस्थांचा झपाट्याने वाढणारा प्रभाव आणि पारदर्शक कार्यपद्धती यामुळेच त्यांना आयएसओ चं नामांकन मिळालं आहे.

ही केवळ संस्थांचीच नव्हे, तर प्रत्येक पत्रकार, प्रत्येक सदस्य आणि समर्थकांचीही कामगिरी आहे. आयएसओ मानांकन मिळणे म्हणजे गुणवत्तेची आंतरराष्ट्रीय खात्री आणि पुढील वाटचालीसाठी अधिक बळ मिळणं. या गौरवाने दोन्ही संस्थांचा आत्मविश्वास आणखी दृढ झाला असून, भविष्यात अधिक व्यापक पातळीवर समाजाभिमुख कार्य करण्याचा संकल्प दोन्ही संघटनांनी व्यक्त केला आहे.आजचा हा क्षण प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अभिमानाचा आहे. व्हाईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व सदस्य, पदाधिकारी आणि समर्थकांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Visits: 107 Today: 4 Total: 1109187
