आनंदगडावर सरस्वतीबरोबर लक्ष्मी नांदेल : ठाणावाला

नायक वृत्तसेवा, अकोले
आनंदगड शैक्षणिक संकुलाच्या रूपाने वीरगाव येथे शैक्षणिक क्रांती झाली असून येथे सरस्वतीचे वास्तव्य आहे. अर्थानंद पतसंस्थेच्या माध्यमातून सरस्वतीबरोबर आता लक्ष्मी सुद्धा आनंदगडावर नांदणार असल्याचे प्रतिपादन थोर समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी केले.

विरगाव येथील आनंदगड शैक्षणिक संकुलातील नूतन अर्थानंद महिला पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरभारतीचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे होते. व्यासपीठावर माळशेज पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत महाराज डुंबरे, संस्थेचे सचिव डॉ. अनिल रहाणे, विश्वास आरोटे, पतसंस्थेच्या चेअरमन गीता राहणे, व्हा.चेअरमन सुप्रिया वाकचौरे, विजय राहणे, मदन आंबरे, रामदास आंबरे, मॅनेजर दादाभाऊ सावंत, राजाराम कुमकर, अशोक उगले,अरुण शेळके, श्रीकांत सहाने, जनार्दन आहेर, जयवंत थोरात, सुनील वाकचौरे, अनिल आंबरे, शांताराम दातीर, संदीप आंबरे,सुनील आहेर, अनिल डोळस,निलेश वाकचौरे, संचालिका दिव्या वाकचौरे, मंजुश्री रहाणे, अक्षता रहाणे, साक्षी रहाणे, प्रगती वाकचौरे,सविता पवार,अर्चना कराड, पल्लवी फलके, सीमा आंबरे,तृप्ती डोळस, प्राचार्य किरण चौधरी, प्राचार्य मिलिंद सुर्वे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, नानासाहेब वाकचौरे, प्रज्ञा गायकवाड, पांडे, पुराणिक, रवींद्र आंबरे,धनंजय भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्तविक डॉ. अनिल रहाणे यांनी केले. स्वागत शिवराज वाकचौरे,अक्षय रहाणे, दिनेश वाकचौरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. संदीप थोरात यांनी तर देविदास चारोडे यांनी आभार मानले.याप्रसंगी प्रा.धनंजय भालेराव,प्रा. डोके प्रा. बागवान, प्रा. शेळके प्रा.आंबरे, प्रा. पथवे, प्रा. प्रिया आंबरे, राहुल तोरमल, अलका आहेर, अंजिरा देशमुख, राधिका देशमुख,पिंगला तोरमल, पुजा चौधरी,सोनाली तनपुरे, मयूरी फटांगरे ,विवेक शेटे, गोरक्ष पवार,माया आंबरे उपस्थित होते.

Visits: 99 Today: 2 Total: 1099795
