पिकअप दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जुन्या नाशिक पुणे महामार्गावरील घुलेवाडी परिसरातील डेंटल कॉलेजसमोर पिकअपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पंढरीनाथ खंडू सावंत (रा. कसारादमाला) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन पोलिसांनी पिकअप चालक राहुल बाजीराव रुपवते (रा.खांडगाव, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रुपवते याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप क्र. एम. एच. १७ बी. वाय. ६०३०) ही भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने चालवून प्लॅटिना मोटारसायकल क्र. (एम. एच. १७ बी. डब्ल्यू. १२००५) हिला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील संजय शिवराम सावंत आणि कृष्णा सावंत हे जबर जखमी झाले.

Visits: 66 Today: 3 Total: 1107006
