अकोले नगरपंचायतमध्ये भाजपचीच सत्ता येणार ः पिचड शक्तीप्रदर्शन करत तहसील कार्यालयात दाखल केले उमेदवारी अर्ज

नायक वृतसेवा, अकोले
अकोल्यात शक्ती प्रदर्शन करीत भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर दुसरीकडे महाविकास आघाडी होणार की नाही याबाबत अद्यापसह संभ्रमाचे वातावरण आहे. नगरपंचायत निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने भाजपचा झेंडा पुन्हा एकदा नगरपंचायतवर फडकविला जाणार असा विश्वास पिचड यांनी व्यक्त केला आहे. यासाठी केंद्र व राज्यातील आरपीआय आठवले गटाने भाजपला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले.

अकोले नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगात आलेली असताना सोमवारी (ता.6) भारतीय जनता पक्षाने माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शक्ती प्रदर्शन करत बहुतांश प्रभागातील उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे अद्याप जागा वाटप स्पष्ट झालेले नाही. कोणत्या पक्षाला कोणता प्रभाग हेही निश्चित झालेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. 21 डिसेंबरला होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) भरण्यासाठी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस बाकी असताना भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप पक्ष कार्यालयापासून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घोषणा देत तहसील कार्यालयात आले. यावेळी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले.

याप्रसंगी कैलास वाकचौरे, शिवाजी धुमाळ, अ‍ॅड. वसंत मनकर, सीताराम भांगरे, अ‍ॅड. के. डी. धुमाळ, उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, भानुदास गायकर, विजय भांगरे, रमेश धुमाळ, सुधाकर देशमुख, नितीन जोशी, धनंजय संत, रोहिदास धुमाळ, रमेश नाईकवाडी, बाळासाहेब वडजे, सचिन शेटे, परशराम शेळके, सोनाली नाईकवाडी, यशवंत आभाळे, राहुल देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, शंभू नेहे, विजय वाकचौरे, राज गवांदे, अमोल वैद्य, हितेश कुंभार, हैदर पठाण, मोहसीन शेख, हुसेन मन्सुरी, चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, राजेद्र गवांदे, निखील जगताप, अनिल नाईकवाडी, डॉ. निवृत्ती नाईकवाडी, शरद नवले, विजय पवार, हिंमत मोहिते, बबलू धुमाळ यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 117 Today: 1 Total: 1586872

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *