बावीस वर्षानंतर एकवटले आयटीआयचे माजी विद्यार्थी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तब्बल २२ वर्षानंतर २००३, २००४ व २००५ या वर्षातील सर्वच ट्रेडच्या तसेच होस्टेलवर राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात अहिल्यानगर येथील आयटीआयच्या सभागृहामध्ये पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटीआयचे सेवानिवृत्त निदेशक तसेच निफाड तालुक्यातील उगाव येथील लोकनियुक्त सरपंच निवृत्ती कोल्हे होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

याप्रसंगी व्यासपीठावर निदेशक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब थोरात, निदेशक संघटनेचे विभागीय अध्यक्ष जालिंदर खाकाळ, आबासाहेब सूर्यवंशी, मछिंद्र बनकर, विजय कुदळे, सुभाष भागवत, कानिफनाथ गोरे, नितीन आव्हाड, धनराज गनुरकर, अविनाश गुंफेकर, विजय बेंद्रे, संजय कोंगे, रावसाहेब धोत्रे, अश्विनी बुरा, सुरेखा देशमुख, निलम बेल्हेकर, वैशाली कुरापाटी रामदास मुळे, दशरथ धांडगे, मछिंद्र वागस्कर, गोरख कुलट, मंदा सुपेकर उपस्थित होते.कार्यक्रमस्थळी सुरुवातीला चहा, नाश्ता व कार्यक्रमानंतर सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हा सोहळा यशस्वीतेसाठी प्रदीप नवल, रोहित टेके, प्रशांत कोकाटे, अंबादास फटे, विठ्ठल चोपडे, विशाल गव्हाणे, कल्याण आमटे, पोपट कदम, सुभाष बळीद, संदीप घुले, प्रकाश भापकर यांच्यासह सर्व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

Visits: 75 Today: 2 Total: 1103749
