अपर पोलीस अधीक्षक आणि शहर पोलिसांची कारवाई!

तीन गावठी कट्ट्यासह दोघांना बेड्या; सात लाखाचा मुद्देमाल हस्तगत

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर व श्रीरामपुर शहर पोलिसांनी दमदार कामगिरी करत तीन गावठी पिस्टल, दहा जिवंत काडतुसे, सहा मॅगझीन व एक इर्टीगा कार सह एकुण ७ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह अनेक गुन्हे दाखल असलेल्या दोन रेकॉर्डवरील आरोपींना बेड्या ठोकल्या.

बुधवार दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना बबलु ऊर्फ इम्तीयाज शहा (रा.वार्ड नं.२ श्रीरामपुर ता. श्रीरामपुर) हा इर्टीगा कार क्र. (एम.एच.१२ एस.डी. ७३३८) यामध्ये अवैधरीत्या अग्नीशस्त्र विक्रीसाठी घेवुन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी आणि श्रीरामपूर शहर पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने श्रीरामपुर शहरात संजय नगर रोड, मिल्लत नगर येथे पाटाच्या कडेला सापळा लावुन सदरची इर्टीगा गाडी पकडण्यात आली. या गाडीमध्ये बबलु ऊर्फ इम्तीयाज आजिज शहा (वय ३५, रा. काझीबाबा रोड बाबपुरा चौक, वार्ड नं. २, श्रीरामपुर ता. श्रीरामपुर) नदिमखान शाबीर खान (वय ३०, रा. नागद रोड, चाळीसगांव जिल्हा जळगांव) असे दोघे मिळून आले.

सदर गाडीची पोलिसांनी झडती घेतली असता गाडीच्या डॅशबोर्ड व मागील शिटचे पॉकेटमध्ये एकुण तीन अवैध अग्नीशस्त्र (गावठी पिस्टल), सहा मॅगझीन, दहा जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन व इर्टीगा गाडी असा एकुण ७ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. याप्रकरणी श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल सतीश पठारे यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरुध्द श्रीरामपुर शहर पो.स्टे. गु.र.नं. ८७७/२०२५ आर्म ॲक्ट ३,५,७,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देखमुख यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम हे करत आहेत.वरील दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यांचेकडे सविस्तर विचारपुस सुरु आहे. आरोपींनी अग्नीशस्त्र का आणले? कोणासाठी आणले? यापुर्वी अशा प्रकारे अग्नीशस्त्र आणली होती काय? कोणाकडुन आणले या सर्व बाबींचा बारकाईने तपास सुरु असुन त्या अनुषंगाने काही संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ. रविंद्र चव्हाण, पो.हे.कॉ. सचिन धनाड, पो.हे.कॉ. संतोष दरेकर, पो.ना. काका मोरे, पो.ना. अनिल शेंगाळे, पो.ना. रामेश्वर वेताळ, पो.कॉ. सतिष पठारे, पो.कॉ. मुख्यालयातील नितीन शेलार, पो.कॉ. अजय अंधारे, आर.सी.पी. पथकातील पो.कॉ. सचिन शेळके, पो.कॉ. गायके, पो.कॉ. भोई, पो.कॉ. आहिरे व श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. गणेश जाधव, पो.स.ई. दादाभाई मगरे, पो.स.ई. रोशन निकम, पो.कॉ. संपत बडे आदींनी केली आहे.

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या बबलु ऊर्फ इम्तीयाज आजिज शहा (वय ३५) रा. काझीबाबा रोड बाबपुरा चौक, वार्ड नं.२ श्रीरामपुर याच्यावर यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सात, राहुरी आणि पुण्याच्या बंद गार्डन पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे नऊ गुन्हे दाखल आहेत.तर नदिमखान साबीरखान मनियार (वय ३०) रा. नागद रोड, चाळीसगांव जिल्हा जळगांव याच्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत. अशा या सराईत गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Visits: 45 Today: 6 Total: 1106101
