अवैध कत्तलखान्यावर छापा; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाच्या भयावह संकटातही शहरातील कत्तलखाने अवैधरित्या सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. रविवारी (ता.25) रात्री पावणे नऊच्या सुमारास जमजम कॉलनीमध्ये टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी 7 लाख रुपयांचे गोमांस व 50 हजार रुपयांची दोन गोवंश जनावरे असा एकूण 7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील जमजम कॉलनीमध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका होईल असे माहीत असतानाही कमरली गुलाम सौदागर (रा.भारतनगर) याच्याकडे 7 लाख रुपयांचे गोमांस व कत्तलीच्या उद्देशाने बांधलेली 50 हजार रुपयांची दोन गोवंश जनावरे मिळून आली. या प्रकरणी पोलीस शिपाई सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं.218/2021 भादंवि कलम 269, 429, सह कलम 5 (क), 9 (अ) हामराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन 7 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लबडे हे करत आहे.

Visits: 166 Today: 2 Total: 2058745

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *