तहसीलदार डॉ.मोरे यांच्यावर कारवाई करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्यामध्ये वाळू तस्करी, रेशन घोटाळा, दाखले वेळेत न मिळणे शेतकऱ्यांना अनेक कामासाठी चकरा मारायला लागणे, अनेक कामासाठी आर्थिक देवाण-घेवाण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे यांचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा ठराव ग्राहक पंचायतच्या तालुका बैठकीमध्ये घेण्यात आला. यासाठी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून कारवाईची मागणी करणार असे ठरले.

अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनील शिंदे होते. यावेळी ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष, भाजपचे तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेश नवले, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन माधव तीटमे, भाजपा जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, वसंत बाळासराफ, बबन तिकांडे, भाऊसाहेब वाकचौरे, साहेबराव दातखिळे, राजेंद्र घायवट, बाळासाहेब बनकर, राजेंद्र गवांदे, शारदा शिंगाडे, रामदास पवार, प्रतिभा सूर्यवंशी, दत्ता ताजणे, शारदा शिंगाडे, ज्ञानेश पुंडे, दत्ता शेटे, कैलास तळेकर आदी उपस्थित होते.

Visits: 125 Today: 3 Total: 1110650
