कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नायक वृत्तसेवा, राहुरी 
तालुक्यातील दवणगाव येथील शेतकरी प्रकाश सदाशिव खपके (वय ४७) या गरीब कुटूंबातील शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
याबाबत माहिती अशी, प्रकाश खपके यांनी हात उसने कर्ज घेऊन स्वतःच्या शेतात डाळींबाची लागवड केली. त्या फळबागेला एक वर्ष झाले तरी अद्याप कवडीचे अनुदान मिळाले नाही. त्यामध्ये अंतरपिक सोयाबिन घेतले. परंतू अतिवृष्टीमुळे पिक उपळून जमिनदोस्त झाले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते उदरनिर्वाहासाठी मजुर म्हणून काम करत होते.  सोसायटी व पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेत ते कायम असायचे. त्या नैराश्येपोटी त्यांनी आपल्या स्वतःच्या विहिरीत जीवन यात्रा संपवली असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, मुलगा, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
Visits: 68 Today: 1 Total: 1099575

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *