अनिल कुटे यांचे कार्य प्रेरणादायी : कुमावत

नायक वृत्तसेवा, अकोले 
भोजदरवाडी सारख्या एका छोट्या वाडीतील प्राथमिक शाळेचा नावलौकीक जिल्हा आणि राज्यात पोहचविण्याचे शिक्षक अनिल कुटे यांचे कार्य इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अकोले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी केले.
तालुक्यातील भोजदरवाडी येथील प्राथमिक शिक्षक अनिल कुटे यांची नुकतीच संगमनेर तालुक्यातील मांची येथे बदली झाली, त्याबद्दल भोजदरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा  सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित  कार्यक्रमात कुमावत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  अध्यक्षपदी विठे येथील केंद्र प्रमुख श्रीमती स्वाती आडाणे होत्या. कुमावत पुढे म्हणाले, कुटे यांच्यासारखे शिक्षक प्राथमिक शिक्षण क्षेत्रात असतील तर ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता नक्कीच उंचावून सक्षम व स्पर्धाक्षम विद्यार्थी तयार होतील.
केंद्रप्रमुख श्रीमती अडाणे यांनीही  अनिल कुटे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी प्रांजली शेळके, समीर धराडे, मोनाली शेळके, तानाजी शेळके, सोमनाथ गंभीरे, डॉ. मनोज सदाफुले, पोलीस पाटील दत्तात्रय वाकचौरे, भाऊसाहेब गोडसे, उपसरपंच अनिकेत आवारी  यांचीही  भाषणे झाली. तर आ. डॉ.किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांनीही उपस्थित राहून  कुटे यांना शुभेच्छा दिल्या.स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनिल मोहटे यांनी केले.तर आभार कु. आरोही फदाले हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोजदरी व परिसरातील सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.
Visits: 199 Today: 1 Total: 2121339

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *