इको-फ्रेंडली कल्पनेला आमची विशेष साथ : गिरीश मालपाणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने नेहमीच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न केले जातात. आम्ही लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायर त्यामध्ये सहभागी असल्याचा आनंद आम्हाला अधिक असल्याचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी सांगितले. शिक्षणाबरोबरच अवांतर स्पर्धा, कला, क्रीडा याचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न झाले पाहिजे असे मतही यावेळी मालपाणी यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन (सफायर) आयोजित शाडू मातीच्या गणेशमूर्ती रंगभरण व सजावट प्रकल्पामध्ये संगमनेरमधील ६०० बालगोपाळ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या चिमुकल्यांसाठी ही स्पर्धा आनंद आणि उत्साह देणारी ठरली. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉनचे संस्थापक अध्यक्ष व माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन गिरीश मालपाणी व माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी उपस्थित होते. व्यासपीठावर सुनिता मालपाणी, अध्यक्ष अॅड. कल्याण कासट, सचिव सुमित मणियार, खजिनदार नामदेव मुळे उपस्थित होते. गेल्या तेरा वर्षांपासून राबवित असलेल्या लायन्स सॅफ्रॉन सफायरचा पर्यावरणपूरक उपक्रम समाजासाठी दिशादर्शक असल्याचे मत मालपाणी यांनी व्यक्त केले.

प्रकल्प प्रमुख देविदास गोरे, प्रशांत गुंजाळ, सुदीप हासे, राहुल गुंजाळ यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.यावर्षी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. ५०० प्रवेश ठरलेले असतानाही ६०० गणेश मूर्ती आयोजकांनी उपलब्ध करून दिल्या. उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला. केवळ विद्यार्थीच नाही तर पालकांनीही रंगभरणमध्ये सहभाग घेऊन कौटुंबिक आनंद साजरा केला. संगमनेर मधील सर्वच शाळांनी या स्पर्धेत भाग नोंदविला. संगमनेरमधील कलाशिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. प्रकल्प संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती भेट म्हणून देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना आपआपल्या घरी भक्तीभावाने केली आहे. पुढील वर्षी अधिक जोमाने ही स्पर्धा आयोजित करणार असल्याचे प्रकल्प प्रमुख देविदास गोरे, सुदीप हासे, प्रशांत गुंजाळ यांनी सांगितले.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. प्रकल्प संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती भेट म्हणून देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना आपआपल्या घरी भक्तीभावाने केली आहे. पुढील वर्षी अधिक जोमाने ही स्पर्धा आयोजित करणार असल्याचे प्रकल्प प्रमुख देविदास गोरे, सुदीप हासे, प्रशांत गुंजाळ यांनी सांगितले.

या पर्यावरणपूरक इको-फ्रेंडली गणेशमूर्ती रंगभरण व सजावट प्रकल्पाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, देवीदास गोरे, प्रशांत गुंजाळ, सुदीप हासे, अतुल अभंग, संतोष अभंग, अमोल भरीतकर, शुभम तवरेज, डॉ. अमोल वालझाडे, उमेश कासट, जितेंद्र पाटील, काशिनाथ गुंजाळ, अक्षय गोरले, विशाल थोरात, अतुल कोतकर, नम्रता अभंग, प्रियंका कासट, संगीता मोरे, सोनल गोरले, मिनल अभंग, प्रियंका शहा, चैताली जोर्वेकर यांच्याबरोबरच सर्व क्लब सदस्यांनी विशेष प्रयत्न घेतले.

Visits: 249 Today: 1 Total: 1583433
