फिजिओथेरपीने मुलांचे आरोग्य बळकट होईल : डॉ.तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
डॉ.नामदेव गुंजाळ संस्थेसाठी वैयक्तिक लक्ष व आपला मौल्यवान वेळ देतात, त्यामुळे चांगली कामे शक्य होतात. फिजिओथेरपी कक्ष उभारल्याने मुलांना रोज उपचार मिळतील आणि त्यांचे शारीरिक आरोग्य बळकट होईल असे प्रतिपादन माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
येथील संग्राम संस्था संचलित डॉ. देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयात सिन्नर एमआयडीसी येथील फाईन केमिकल लिमिटेड, ॲडव्हान्स एन्झाईम टेक्नॉलॉजीस लि.व इटरनिस फाईन केमिकल लि. या कंपन्यांच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या फिजिओथेरपी हॉलचे उद्घाटन ॲडव्हान्स एन्झाईम टेक्नॉलॉजीस लि.चे महाव्यवस्थापक किशोर राठी व  मानव संसाधन व प्रशासन इटरनिस फाईन केमिकल लि.चे वरिष्ठ व्यवस्थापक विलास नाठे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. तांबे बोलत होते.
यावेळी  इंटरनिस फाईन केमिकल लि.चे कारखाना व्यवस्थापक प्रणव कांडेकर, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासहित विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी किशोर राठी म्हणाले, दिव्यांग मुलांच्या शारीरिक आरोग्यासाठी फिजिओथेरपी हॉल उभारण्यात आम्हाला सीएसआरच्या माध्यमातून मोलाची मदत करता आली. या हॉलमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यात निश्चितच मदत होईल. पुढेही कंपनी शैक्षणिक पुनर्वसनासाठी सातत्याने मदत करेल,असे आश्वासन त्यांनी दिले.
संग्राम संस्थेचे सेक्रेटरी  डॉ. नामदेव गुंजाळ आपल्या प्रास्ताविकात म्हणाले,  सीएसआर च्या माध्यमातून दिव्यांगांना नवीन बळ मिळेल. फिजिओथेरपी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण समजला जाईल असे सांगत त्यांनी संस्थेच्या ३५ वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच त्यांनी सचिन तेंडुलकर यांनी दिलेल्या ५० लाखांच्या निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचा ३५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचे स्वप्न मांडत पुढील काळातही उद्योग जगताची साथ मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी  अंकित राठी, कमलाकर पोटे, सुनील कुंदे, जपे, आरोटे, खताळे, अथर्व केदारी, सुनील अट्टल, लाहोटी,  डॉ. गडाख, सौरभ केदारी,  पवार, हरिभाऊ गायकवाड, वसंत बंदावणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार मुख्याध्यापक सुनील कवडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संग्राम मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक,  सुनील कवडे, देवेंद्रराम मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक  चांगदेव खेमनर,  आनंद अल्ले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Visits: 244 Today: 2 Total: 2122871

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *