विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून रोजगाराभिमुख शिक्षण देण्याचे धोरण : डॉ. ढाकणे

नायक वृत्तसेवा, शेवगाव
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ढाकणे शैक्षणिक संकुल कटिबद्ध असून पॉलिटेक्निक डिप्लोमा इंजीनियरिंगच्या शंभर टक्के जागा भरल्या आहेत.याचे सर्व श्रेय पंधरा वर्षे संस्थेने केलेली मेहनत, विश्वस्त, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेले अनन्यसाधारण काम या कामी आले आहे.ढाकणे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून रोजगाराभिमुख शिक्षण देण्याचे धोरण संस्थेचे असून जास्तीत जास्त रोजगाराभिमुख विद्यार्थी घडवले जातील व या संकुलामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी देण्याची शंभर टक्के हमी दिली जाईल असे प्रतिपादन ढाकणे शैक्षणिक संकुलाचे सर्वेसर्वा डॉ.एकनाथ ढाकणे यांनी केले.

७९ वा स्वातंत्र्य दिन तालुक्यातील राक्षी येथील ढाकणे शैक्षणिक संकुलात उत्साहात पार पडला. संस्थेच्या सचिव जया एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. ढाकणे बोलत होते. यावेळी श्रीकांत ढाकणे, डॉ. आर.एच.अत्तार,महेश मरकड,संतोष आंधळे,राजेंद्रकुमार गुजर,योगेश शिरसाट, प्रा. सुनील अवताडे सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शासकीय सेवेत दाखल झालेल्या ऋषिकेश जगन्नाथ चेमटे यांचा शाल, बुके, फेटा, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या सचिव जया ढाकणे,श्रीकांत ढाकणे,महेश मरकड,योगेश शिरसाट,राजकुमार गुजर,संतोष आंधळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यानंतर अद्यावत उपहारगृहाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष एकनाथ ढाकणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सुनील अवताडे व आभार महेशकुमार मरकड यांनी मानले.

Visits: 109 Today: 4 Total: 1110657
