स्वातंत्र्यदिन बलिदानाची आठवण ठेवणारा दिवस : प्राचार्य वडितके

नायक वृत्तसेवा, आश्वी
स्वातंत्र्यदिन हा आनंदाचा सोहळा असला तरी त्यामागे असलेला त्याग, बलिदान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश नेहमीच लक्षात ठेवावा. आजच्या पिढीने १५ ऑगस्ट हा फक्त ध्वजवंदन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा दिवस म्हणून नव्हे, तर देशासाठी एकतेची शपथ घेण्याचा आणि बलिदानाची आठवण ठेवण्याचा दिवस म्हणून पाहावा, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देवराम वडितके यांनी केले.

७९ व्या भारतीय स्वातंत्र दिन आश्वी परीसरामध्ये उत्साहाने व आंनदाने साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी प्राचार्य देवराम वडितके बोलत होते.सकाळी आश्वी पोलीस ठाणे येथे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर जिल्हा परीषद प्राथमिक शाळा मुले व मुलींच्या शाळेत मुख्याध्यापक रामदास ढगे, आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्या दर्शना ताजणे यांच्या हस्ते तर आश्वी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्थानिक स्कुल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सुभाष म्हसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्राचार्य़ देवराम वडितके पुढे म्हणाले की, देशभरात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मात्र हा दिवस केवळ उत्सवाचा नाही, तर शेकडो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि पराक्रमाची आठवण करून देणारा दिवस आहे. यावेळी भाऊराव कांगुणे, बाळकृष्ण होडगर, सिताराम चांडे, सुमतीलाल गांधी, सुशिल भंडारी, पर्यवेक्षक दिपक चव्हाण, रमेश थेटे, मोहन घिगे, सुवर्णा वाकचौरे, अनिता गाडे, वैशाली सोसे, बी.एस. सहाणे, भाऊसाहेब गिते, हौशीराम मेचकर, संगिता क्षिरसागर, सरपंच नामदेव शिदे,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खेमनर,अजर शेख,सारीका जऱ्हाड,अनिल कंगणकर, संतोष ताजणे, शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वैभव ताजणे यासह विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१४ ऑगस्ट रोजी आश्वी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या समाधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी एकमुखाने ‘पसायदान’ म्हटले. या वेळी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्याचा आणि त्यांच्या अध्यात्मिक विचारांचा आढावा घेण्यात आल्याची माहीती पर्यवेक्षक दिपक चव्हाण यांनी दिली.

Visits: 99 Today: 2 Total: 1099449
