हुतात्म्यांचे स्मरण होणे आवश्यक : पुष्पा लहामटे

नायक वृत्तसेवा, राजुर
ज्या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध लढतांना प्राणाची आहुती दिली, त्यांचे स्मरण होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पुष्पा लहामटे यांनी केले.

अकोले तालुक्यातील राजुर येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी पुष्पा लहामटे बोलत होत्या. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोजकुमार पैठणकर, संतोष ढोणे, संजय सोनवणे, आदिवासी सेवक सखाराम गांगड यांचे सह सर्व कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासींचे योगदान खूप महत्वाचे होते. मात्र इतिहासामध्ये त्यांची नावे नाहीत. ब्रिटिशांच्या जुलमी व अन्यायी राजवटीविरुद्ध आदिवासी क्रांतिकारकांनी लढा दिला होता असे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.

यावेळी आदिवासी लोक कलेचे दर्शन घडवत प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुर मध्ये जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. समाजाच्या रुढी आणि परंपरा बालपणापासूनच मनात रुजविण्यासाठी सर्व आश्रम शाळा व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या मिरवणुकीत सहभागी करण्यात आले होते. या मिरवणुकीत उडदावने येथील महिला कांबड नृत्य विशेष आकर्षक ठरले. मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. प्रस्ताविक मनोज पैठणकर यांनी केले. सूत्रसंचालन मुकुंद सूर्यवंशी तर देवंद्र शेंडे यांनी आभार मानले.

Visits: 87 Today: 2 Total: 1109339
