सीबीएसई इंटरस्कूल डान्स स्पर्धेत वसुंधराचे उत्तुंग यश

नायक वृत्तसेवा, अकोले
ध्रुव ग्लोबल स्कूल येथे आयोजित सहोदया संगम चाप्टर नृत्यांजली सीबीएसई इंटरस्कूल डान्स स्पर्धेत सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये वसुंधरा अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी कामगिरी करत अकॅडेमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत उत्तुंग यश संपादन केले.

या स्पर्धेतील क्लासिकल नृत्य प्रकारात ९ वर्षांखालील वयोगटात वसुंधरा अकॅडेमीच्या ओवी शरद सातपुते या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला तसेच पारंपारिक नृत्य प्रकारात १४ वर्षांखालील वयोगटात श्रेया धनराज वाकचौरे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक तर ईश्वरी शरद सातपुते हिने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांसोबत श्रवण शिंदे, सिद्धी देशमुख, आश्लेषा रत्नपारखी, समीक्षा चासकर, शौर्या वाकचौरे या विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवत उत्तम नृत्यप्रकार सादर केले. या सर्व विद्यार्थ्यांना वसुंधरा अकॅडमीचे नृत्यशिक्षक प्रशांत दिवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. वसुंधरा अकॅडमीच्या या यशाबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, सचिव विक्रम नवले, कोषाध्यक्ष तथा कॅम्पस डायरेक्टर व वसुंधरा अकॅडेमीच्या प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, सहसचिव प्राचार्या अल्फोन्सा डी., उपप्राचार्या राधिका नवले, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.
Visits: 210 Today: 3 Total: 1110653
