विघ्नेशाने दिला चित्रांतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयातील इयत्ता पाचवीत  शिकणाऱ्या कु. विघ्नेशाराजे किशोर आहेर हिने  एक आगळावेगळा उपक्रम राबवत निसर्ग व पर्यावरण विषयक तब्बल १०१ चित्रांची निर्मिती करून पर्यावरण रक्षणाचा  संदेश आपल्या स्वनिर्मित चित्रनिर्मितीतून  दिला.
या चित्रांमधून निसर्गाचे विविध पैलू हिरवीगार वने, नद्या, प्राणी-जिवसृष्टी, वनीकरण, हवामान बदल, जलप्रदूषण, प्लास्टिकचा त्रास अशा अनेक विषयांना स्पर्श करून आपल्या चित्र निर्मितीतुन संदेश दिला आहे. ही सर्व चित्रे तिने स्वतः रंगवली असून, त्यामध्ये सामाजिक जाणीव व सर्जनशीलता यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो.
या उपक्रमामागील उद्देश केवळ चित्रनिर्मिती नव्हे, तर निसर्गप्रेम आणि निसर्ग संवर्धनाची भावना जनमानसात जागवणे असल्याचे तिने सांगितले.या चित्रांचे प्रदर्शन शाळेच्या  कला गॅलरीत आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले आहे.’निसर्ग वाचवा, जीवन वाचवा’ या संदेशाने भारलेली ही १०१ चित्रे पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणा देणारी ठरत आहेत.
तिच्या कला कौशल्याबद्दल व परिश्रमाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य  ए.सी. खेमनर, उपमुख्याध्यापक एस.एम. राहाणे,  श्रीमती एस.ए.कानवडे,  कलाशिक्षक बी.एम.रावताळे, ए.सी.शिरतार, डी.जी.खरात यांच्यासहित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे व तिच्या पालकांचे विशेष कौतुक केले.
Visits: 100 Today: 2 Total: 1110593

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *