मराठी चित्रपट महामंडळाच्या आरोग्य समितीवर डॉ.गावित्रे

मराठी चित्रपट महामंडळाच्या आरोग्य समितीवर डॉ.गावित्रे
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईनाथ रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, युवा मराठी चित्रपट संस्थेचे संस्थापक, अशोका ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचेे अध्यक्ष, ग्राहक प्रबोधन समितीचे राज्य उपविभाग संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य अश्वमेध मेडीकल ट्रस्ट, मोहन फौंडेशन व मद्रासचे लाईफ मेंबर डॉ.अशोक गावित्रे यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आरोग्य समितीवर निवड करण्यात आली आहे.

पुणे येथील महामंडळ मुख्य कार्यालयात पार पडलेल्या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते डॉ.गावित्रे यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉ.गावित्रे म्हणाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने माझ्यावर जो विश्वास दाखवून मला काम करण्याची संधी दिली तिला नक्कीच न्याय देऊन कलाकारांच्या अधिकाधिक आरोग्य समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. बरीच वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आरोग्य समितीला नक्कीच याचा फायदा होईल. यावेळी अण्णा गुंजाळ, भरारी पथक सदस्य नागनाथ गवसाने, दिग्दर्शक अविनाश खोचरे, नंदन खरे, अमित अग्रवाल, अभिनेत्री ममता तायडे, तेजस्विनी भंडारे, पत्रकार प्रीतम शहा उपस्थित होते.

 

Visits: 168 Today: 1 Total: 1869663

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *