मनोली-उंबरी बाळापूर रस्त्यावर स्विफ्टचा अपघात एकाचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

नायक वृत्तसेवा, आश्वी
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर- मनोली रस्त्यावर स्विफ्ट कार च्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. भास्कर बबन मांढरे असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून विकास गायकवाड हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवार दि. २१ जुलै रोजी सकाळच्या सुमारास आश्वी खुर्द (ता संगमनेर) येथील विकास साहेबराव गायकवाड (वय ४२) आणि भास्कर बबन मांढरे (वय ७५) हे स्विफ्ट गाडीतून मनोली मार्गे संगमनेरला जात होते. यावेळी उंबरी बाळापूर शिवारातील मनोली रस्त्यावर असलेल्या अरगडे आणि भुसाळ वस्तीलगत त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यावेळी स्विफ्ट कार च्या ब्रेकचा मोठा आवाज झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघां जखमींना तात्काळ उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठवले. या अपघाताचे कारण समोर आले नसले तरी, समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा स्थानिक ग्रामस्थात सुरू होती.जखमींना संगमनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता भास्कर मांढरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. जखमी विकास गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयत भास्कर बबन मांढरे यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे, एक भाऊ, पुतण्या असा मोठा परिवार आहे.आश्वी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव मांढरे यांचे बंधु तर डॉ. दत्तात्रय मांढरे यांचे ते चुलते होते.

Visits: 107 Today: 1 Total: 1101632
