मठाचीवाडी येथे दोन गटांत वाद; परस्पर फिर्यादींवरुन गुन्हे दाखल

मठाचीवाडी येथे दोन गटांत वाद; परस्पर फिर्यादींवरुन गुन्हे दाखल
नायक वृत्तसेवा, शेवगाव
तालुक्यातील मठाचीवाडी येथील स्वस्त धान्य दुकानात काही कारणास्तव दोन गटांत वाद होऊन पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल झाले आहेत.


यामध्ये एका गटातील भास्कर सर्जेराव शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, सीताराम श्रीपती करंजे व चकडूबाळ दादा भूमकर यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गु.र.नं. 964/2020 प्रमाणे अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3/1(4)3 प्रमाणे आणि भादंवि कलम 330, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्‍या गटाने स्वस्त धान्य दुकानातील वडीलांच्या वाट्याचे धान्य देण्यास नकार दिल्याने दुकानदार महिलेचा हात धरुन लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करुन ‘तुमच्या नवर्‍याची नोकरीच घालवतो व तुमच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करतो’, असा दम दिल्याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन भास्कर सर्जेराव शिरसाठ याच्याविरोधात गुरनं.966/2020 प्रमाणे भादंवि कलम 354, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 190 Today: 1 Total: 2057200

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *