दुर्गापुर-चिंचपूर पाझर तलाव दुरुस्तीचा शुभारंभ! तीन गावांच्या होणार पाणी पातळीत वाढ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यातील दुर्गापुर आणि संगमनेर तालुक्यातील चिंचपूर शिव रस्त्यालगत असलेल्या जलसंधारण विभागाच्या पाझर तलाव दुरुस्तीचा शुभारंभ नुकताच पार पडला.

दुर्गापुर आणि चिंचपूर शिव रस्त्यालगत असलेल्या जलसंधारण विभागाच्या पाझर तलावाच्या दुरुस्तीचा शुभारंभ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन कैलास तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. या पाझर तलावाची दुरुस्ती झाल्यानंतर त्याचा फायदा राहाता तालुक्यातील दुर्गापूर आणि संगमनेर तालुक्यातील चिंचपूर परिसरासह चंद्रापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी होणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील आणि नगर दक्षिणचे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन कैलास तांबे, गिताराम तांबे, नाना पुलाटे, सुनिल जाधव, छगन पुलाटे, बाबासाहेब तांबे, प्रशांत तांबे यांच्यासह दुर्गापूर, चंद्रापूर, चिंचपूर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाझर तलावाची दुरुस्ती झाल्यानंतर याचा फायदा वरील तीन गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालिनी विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
Visits: 143 Today: 1 Total: 1099591
