वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

नायक वृत्तसेवा, साकुर
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड.अमित कोंडीभाऊ धुळगंड यांचे मोठे बंधू अमोल कोंडीभाऊ धुळगंड, यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जिल्हा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

अमोल धुळगंड यांनी वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बरोबर खाऊचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहत होता. यावेळी दत्तू बर्डे, सलीम शेख, वामन धुळगंड, अलीम शेख, सुनील कुटे, अजय बिडकर, संतोष बिडकर ,दौलत माळी, आवेज आतार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 112 Today: 1 Total: 1108278
