व्यसनमुक्त गावे दत्तक घेऊन सर्वाधिक निधी देऊ : आ.लहामटे

नायक वृत्तसेवा, अकोले
ग्रामपंचायत निवडणुकीत जी गावे बिनविरोध होतील. त्या गावांना २५ लाखांचा विकास निधी जाईल अशी घोषणा मी केली होती. त्याचप्रमाणे जी गावे व्यसनमुक्त होतील, ती गावे दत्तक घेऊन तालुक्यात सर्वाधिक निधी देण्यात येईल असा संकल्प आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला.

अगस्ती आश्रम येथे गुरुपौर्णिमा उत्सवनिमित्ताने देवराम महाराज इदे यांना वारकरी भूषण पुरस्कार देण्यात आला. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आ.लहामटे बोलत होते.
मागील वर्षापासून अगस्ती देवस्थान येथे गुरुपौर्णिमेनिमित्त किर्तन सोहळा आणि अध्यात्म क्षेत्रात उत्तम कार्य केलेल्या जेष्ठ कीर्तनकार महाराजांना वारकरी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते.यंदाचा हा पुरस्कार आदिवासी समाजाचे भूषण असणाऱ्या देवराम महाराज ईदे यांना देण्यात आला.

सन्मान चिन्ह,ट्रॉफी वारकरी पोषाख आणि वारकरी फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सुनील महाराज मंगळापूरकर यांची सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली.
या योगी केशवबाबा चौधरी, रामनाथ महाराज जाधव, तुकाराम महाराज मुठे, दीपक महाराज साबळे, अरुण महाराज शिर्के, गणेश महाराज वाकचौरे, बाळासाहेब महाराज देशमुख, रामनाथ महाराज देशमुख, नितीन महाराज देशमुख, सागर नवले, योगेश पांडे यासंह वारकरी व भाविक या वेळी उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र महाराज नवले यांनी तर सन्मानपत्राचे वाचन दिपक महाराज देशमुख यांनी केले. ॲड. के.डी. धुमाळ यांनी आभार मानले.

Visits: 121 Today: 3 Total: 1107950
