चणेगाव येथे शेतकरी चर्चासत्राला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
नायक वृत्तसेवा, झरेकाठी
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी महाविद्यालय लोणी, व श्री रामेश्वर विद्यालय चणेगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे शेतकरी चर्चासत्र नुकतेच पार पडले.

या चर्चासत्राला परिसरातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक मच्छिंद्र पावडे होते. तर व्यासपीठावर प्रवरा बॅंकेचे संचालक बाजीराव खेमनर,प.डॉ.विखे पाटील कारखान्याचे संचालक बाबासाहेब लोहाळे, ज्येष्ठ नागरिक शहाजीर खेमनर,कृषिभूषण विठ्ठलदास आसावा, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खेमनर, हिरामण लोहाळे, रवींद्र राठी,शंकर हजारे, कृषी महाविद्यालय समन्वयक प्रा. डॉ. जाधव, श्री रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.अनिल लोखंडे, कृषी पर्यवेक्षक प्रांजल कवडे, बचत गट सी.आर.पी मंगल खेमनर, पत्रकार सोमनाथ डोळे, शिक्षक एच. टी. कानगुडे, वर्पे,डॉ.श्रीकांत लोहाळे, सुभाष तुपे, गायकवाड, विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 115 Today: 1 Total: 1114126

