संगमनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा! काँग्रेसची मागणी; तातडीच्या मदतीसाठी ठिय्या


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील सर्व गावांमध्ये सततचा पाऊस पडून सोयाबीन पिकासह सर्व खरीप पिके वाया गेली आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून तातडीने भरीव मदत मिळावी व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. या मागणीसाठी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

संगमनेर प्रांताधिकारी कार्यालय येथे तालुका व शहर काँग्रेस समितीच्यावतीने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना भरीत मदत मिळावी यासाठी हे आंदोलन करत निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, रामहरी कातोरे, लक्ष्मण कुटे, नवनाथ अरगडे, संपत डोंगरे, अजय फटांगरे, निखील पापडेजा, नितीन अभंग, संतोष हासे, विजय रहाणे, राजेंद्र चकोर, आनंद वर्पे, बादशहा वाळुंज, जावेद शेख, जयराम ढेरंगे, संतोष नागरे, सुनील कडलग आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये यावर्षी चांगला पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणात असलेले सोयाबीन पीक व इतर खरीप पिके वाया गेली आहेत. याचा मोठा आर्थिक फटका तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना बसला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांमधील सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाकडून तातडीने भरीव मदत या शेतकर्‍यांना द्यावी अशी काँग्रेसची आग्रही मागणी आहे. याप्रसंगी रामनाथ कुर्‍हे, तात्याराम कुटे, सचिन खेमनर, राजेंद्र खेमनर, शहाजी खेमनर, शिवाजी गोसावी, अक्षय दिघे, राजेंद्र थोरात, हृतीक राऊतसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सरकार विरोधी घोषणा देत ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांनी निवेदन स्वीकारले.

Visits: 10 Today: 1 Total: 115346

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *