टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमले साकुर! विरभद्र विद्यालयाचा बाल दिंडी सोहळा दिमाखात

नायक वृत्तसेवा, साकुर
तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथील विरभद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या बालदिंडीतून निघणाऱ्या टाळ, मृदंगाच्या, आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.

विद्यार्थ्यांनी हरिनामाचा आणि टाळ, मृदुंगाच्या गजरात गावातून भक्तिमय वातावरणात दिंडी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाईची वेशभुषा साकारल्याने या दिंडीचे ते आकर्षण ठरले. बस स्थानक परिसरात विद्यार्थ्यांच्या या दिंडीतील वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या अभंगावर मनमोहक नृत्य सादर करत ग्रामस्थांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर रिंगण सोहळा करत फुगडी देखील खेळण्यात आली. दिंडीच्या समारोपावेळी सर्वांना साबुदाणा खिचडीचा स्वादिष्ट अल्पोपहार देण्यात आला. या दिंडीत विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, शिक्षक खेमनर, ढमढेरे, कुदनर, बाचकर, विक्रांत खिल्लारी, प्राचार्य एस.के. खेमनर, पर्यवेक्षक पवार, अंभोरकर, हजारे, केदार, कांबळे, पाडेकर, सोनवणे, एम.ए. खेमनर, डी.के. खेमनर, वडीतके, श्रीमती गंभीरे, श्रीमती शेख, श्रीमती वाघुंडे, श्रीमती त्रिभुवन, कुदनर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Visits: 133 Today: 2 Total: 1103230
