इंजि.गायकर यांचा शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात

नायक वृत्तसेवा, अकोले
युवा उद्योजक,साई एंटरप्राईजेस उद्योग समूहाचे संचालक तथा अगस्ती पतसंस्थेचे संचालक इंजि. निलेश ज्ञानदेव गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतुन तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला.
तालुक्यातील कुमशेत, बोरीचीवाडी, उंबरवाडी, लव्हाळवाडी येथील विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्याचे तसेच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू , खाऊ यांचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.याप्रसंगी शिक्षक भांगरे, श्रीमती आरोटे, अनुज देशमुख, वाकचौरे, गिऱ्हे,मुन्ना शेख, संदीप शेळके, अभिजित खर्डे, सुयश शेळके,चिंतामण अस्वले, बारकु अस्वले, संदीप अस्वले, योगेश काळे, आशिष राऊत यांच्या सह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Visits: 109 Today: 1 Total: 1107509
