नाभिक समाजाकडून माजी मंत्री थोरात यांचा सत्कार

नायक वृत्तसेवा, समनापुर
सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील समनापुर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नाभिक समाजाचे युवा कार्यकर्ते रामदास जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, भास्कर शेरमाळे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ संगमनेर तालुकाध्यक्ष पत्रकार बाबासाहेब जाधव, आधार फाउंडेशनचे समन्वयक विठ्ठल कडूसकर, कचरू भालेकर, स्वामीवैभव बिडवे, संजय बिडवे, गोरख शिंदे, संतोष बिडवे, प्रशांत कदम, ज्ञानेश्वर पंडित, अमोल संत, नवनाथ जाधव, राजेंद्र जाधव, तुषार कडवे, संकेत बिडवे, सोमनाथ जाधव, संतोष वाघ, रवींद्र वाघ,भागचंद्र राऊत,वनिता कडवे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Visits: 72 Today: 2 Total: 1108941
