श्री साई सच्चरित्र पारायनाचे साई मंदिरात आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील प्रवरा नदीकाठी असलेल्या साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवार दि.३ जुलै ते गुरुवार दि.१० जुलै या कालावधीत श्री साई सच्चरित्र पारायनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्यवस्थापन मंडळाने दिली.

दरवर्षी साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त साई सच्चरित्र पारायणाचे आयोजन करण्यात येते. यंदाही साई मंदिरात श्री.साई सच्चरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दि. ३ जूलै रोजी सकाळी ७ वाजता या पारायण सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सकाळी श्री साई सच्चरित्र पारायणाचा सामूहिक संकल्प सोडला जाणार आहे. ज्या भाविकांना या पारायण सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी संकल्प सोडण्यासाठी श्री.साई मंदिराच्या पारायण हॉलमध्ये उपस्थित राहणे गरजेचे आहे. गुरुवार दि.३ जुलै ते गुरुवार दि. १० जुलै असे आठ दिवस हा श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा होणार आहे पहाटे ५.३०ते रात्री १० या वेळेत भाविकांना आपल्या सोयीच्या वेळेनुसार श्री साई पारायणाचे वाचन करावयाचे आहे. गुरुवार दि. १० जुलै रोजी सकाळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री.साई पारायण करणाऱ्या भाविकांची सामूहिक सत्यनारायण पूजा होणार आहे. पारायण पूर्ण करणाऱ्या भाविकांना श्री साई सच्चरित्र ग्रंथ व साईबाबांचा प्रतीमा प्रसाद म्हणून भेट दिली जाणार आहे. ज्या भाविकांना श्री साई चरित्र पारायण सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे.अशा साई भक्तांनी आपली नावे साई मंदिरात नोंदवावी असे आवाहन साई व्यवस्थापक मंडळाने केले आहे.

Visits: 143 Today: 1 Total: 1107702
