विद्यार्थ्यांच्या मतदानातून झाली वर्ग प्रतिनिधींची निवड

नायक वृत्तसेवा, साकुर
संगमनेर तालुक्याच्या पठार भागात असलेल्या साकुर येथील वीरभद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य सोपान खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या मतदानातून वर्ग प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उच्च माध्यमिक विद्यालयाचे इन्चार्ज सोपान धुळगंड यांनी काम पाहिले तर निवडणूक अधिकारी म्हणून  संतोष कुदनर, अनिल वडीतके, भाऊसाहेब वावरे, सोमेश्वर गायकवाड, तान्हाजी हिले, नवनाथ नालकर, प्रकाश टेकूडे, प्रा. वैशाली गायकर, मनीषा त्रिभुवन, ज्योती वडीतके, तसेच सर्व शिक्षकांनी  काम पाहिले. वीरभद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात यंदा प्रथमच निवडणूक प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांच्या मतदानातून वर्ग प्रतिनिधींची निवड करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या मतदान प्रक्रियेसाठी मतदान कक्ष, निवडणूक कक्ष, मतदान यादी, मतदानाचा हक्क याची सर्व माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली.
 उद्याचं भविष्य विद्यार्थ्यांच्या हातात असून विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. वीरभद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राज्यांमध्ये नाव लौकिकास पात्र ठरेल असं काम करणार असून शाळेमध्ये भविष्यात विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे प्राचार्य सोपान खेमनर यांनी यावेळी सांगितले.
Visits: 28 Today: 1 Total: 1099362

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *