पालकमंत्र्यांनी राज्यात वेगळा आदर्श निर्माण केला : योगेश तांबे

नायक वृत्तसेवा, आश्वी  
जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांचे संपुर्ण जिवन हे संघर्षमय राहीले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात काम करतांना त्यांना मिळालेल्या प्रत्येक खात्यामध्ये त्यांनी नविन्यपुर्ण बदल घडवून आणत राज्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे प्रतिपादन  श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश तांबे यांनी केले.
राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील महात्मा फुले विद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व नवोदित विद्यार्थ्यांना  स्कुल बॅग्स (सॅक) चे वाटप तसेच विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी योगेश तांबे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकनियुक्त सरपंच तात्यासाहेब सातपुते, कारखान्याचे माजी संचालक अशोक गाडेकर, संचालक प्रताप तांबे, भाऊराव गाडेकर,विद्यालयाचे प्राचार्य थेटे, भरत वाकचौरे उपस्थित होते.
पुढे बोलतांना योगेश तांबे म्हणाले की, नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे स्व. खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे  प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्य़त पाणी पोहचवण्याचे स्वप्न पूर्ण  करत आहेत. खऱ्या अर्थाने ते आधुनिक काळाचे जलनायक  असुन ते आपले काम अत्यंत शांतपणे करत असतात. महाराष्ट्र सरकार मध्ये आज पर्यत विखे पाटील यांनी अनेक खाती सांभाळली असून प्रत्येक खात्यामध्ये नविन्य पुर्ण काम  विखे पाटील यांनी केले आहे.
यावेळी  प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रविंद्र वाणी, संतोष तांबे,बाळासाहेब गाडेकर,अशोक जंगम,अशोक दहीवळकर,बाळासाहेब पाळंदे,जॉन पाळंदे,राज इनामदार,दादासाहेब दिवे,भगवान झनान,संजय गाडेकर,विलास तांबे, नानासाहेब तांबे,रविंद्र बनसोडे,शुभम वाणी,संतोष वाणी,भागवत तांबे,रितेश कुमकर आदींसह  स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य,पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक थेटे यांनी केले. सूत्रसंचालन इलग यांनी तर आभार श्रीमती ब्राम्हणे तसेच अनर्थे यांनी मानले.
Visits: 231 Today: 1 Total: 2168688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *