मूलभूत सुविधा कमी पडू देणार नाही : निलम खताळ

नायक वृत्तसेवा, साकूर
जिल्हा परिषदेच्या शाळांमधुन विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत असुन यापुढे देखील पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि आ. अमोल खताळ यांच्या माध्यमातुन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना लागणार्या मुलभुत सुविधा कमी पडु देणार नाही अशी ग्वाही निलम खताळ यांनी दिली.

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६’ या उपक्रमांतर्गत संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ यांनी सोमवारी तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.यावेळी शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच यानिमित्ताने आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी शुभेच्छारुपी दिलेल्या शालेय साहित्याचे वाटप गरजु विद्यार्थ्यांना निलम खताळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी निलम खताळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधुन नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन निधीतुन शाळेला दिलेल्या डिजिटल इंटर ॲक्टिव्ह बोर्डची ही पाहणी केली.
या कार्यक्रमाला भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख,भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले,बाळासाहेब खेमनर,बुवाजी खेमनर,मच्छिंद्र खेमनर,भिमराज जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी शालेय प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापिका शायदा शेख यांनी निलम खताळ यांचा सत्कार केला. पं.स.चे शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण राऊत, केंद्रप्रमुख भोसले,संतोष झावरे,संतोष जाधव,विकास मिसाळ, श्रीमती हासे, श्रीमती कोंडार, श्रीमती गडगे आदी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 114 Today: 1 Total: 1109459
