चंदुकाका सराफमध्ये सौभाग्य अलंकार महोत्सव 3333 चांदीचे बार जिंकण्याची ग्राहकांना सुवर्णसंधी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
1827 पासून शुध्द सोने, पारदर्शक व्यवहार व नाविन्यपूर्ण डिझाईन्स् यासाठी प्रसिध्द असलेल्या चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रा. लि. यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षासाठी सौभाग्य अलंकार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक येथील सर्व शाखांमध्ये हे आयोजन करण्यात आले आहे.

सौभाग्य अलंकार महोत्सव हा पत्नी आणि पती यांच्यातील पवित्र नात्याचा उत्सव साजरा करण्याचा एक शुभ सोहळा आहे. मंगळसूत्र म्हणजे या सौभाग्य अलंकारांमधील सर्वात मौल्यवान व स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा दागिना. प्रत्येक भारतीय स्त्रीच्या गळ्यात सजून तिला अद्वितीय सौंदर्य प्रदान करणारा हा दागिना म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे, पती पत्नीमधील अतूट नात्याचे, प्रेम आणि विश्वासाचे शुभ प्रतीक.

चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स यावर्षी सौभाग्य अलंकार महोत्सवात घेऊन येत आहेत. सोने व हिर्‍यांच्या मंगळसूत्रांचे आकर्षक कलेक्शन, ज्यात सोने, हिर्‍यांचे फॅन्सी, ट्रेंडी, मोठे आणि लहान मंगळसूत्र, मदर ऑफ पर्ल्स, एनॅमल, ब्लॅक ऑनिक्स, अँटीक, टेंपल, कुंदन मंगळसूत्रांचा समावेश असून हिर्‍यांच्या मंगळसूत्रांचे नाविन्यपूर्ण डिझाईन्स् हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. या महोत्सवात ग्राहकांना 19 हजार 999 रुपयांच्या दागिन्यांच्या खरेदीवर 3333 चांदीचे बार जिंकण्याची संधी सुवर्णसंधी उपलब्ध आहे. यामध्ये हिर्‍यांच्या दागिने खरेदीवर 2 कूपन आणि सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर 1 कूपन मिळणार आहेत. खरेदीवेळी 9 हजार 999 रुपये भरून उर्वरीत रक्कम हप्त्यांमध्ये भरून तुमचे आवडते दागिने देखील घरी घेऊन जाऊ शकता. तरी या अलंकार महोत्सवाला भेट द्या आणि मंगल आनंद घरी घेऊन जा आणि सुरुवात करा अलौकिक सौंदर्याची! सौभाग्य अलंकार महोत्सवात सहभागी होण्यासाठी तुमच्या जवळील चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.च्या शोरूमला भेट द्या असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 192 Today: 1 Total: 1100416

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *