टाळ-मृदंगाच्या गजरात चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत 

नायक वृत्तसेवा, धांदळफळ
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे  अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. पारंपरिक टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावातून ही मिरवणूक फेरी स्वरूपात नेण्यात आली, यामध्ये शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक असलेले गणवेश, शुज, पाठ्यपुस्तकेही मोफत देण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी मुलांचे मनोबल वाढवणारे मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून, गावात शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून झालेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून, ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रोत्साहनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
Visits: 222 Today: 1 Total: 2168947

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *