म्हाळुंगी पूलाचे आ.खताळ यांच्या हस्ते लोकार्पण!  शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय झाली दूर

नायक वृत्तसेवा, संगमनेर  
शहरातील उपनगरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा स्वामी समर्थनगर ते संतोषी माता मंदिर दरम्यानच्या म्हाळुंगी नदीवरील पूलाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत  आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
 गत चार वर्षांपूर्वी म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे  हा पूल कोसळला होता, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी व स्थानिक नागरिकांची मोठी  गैरसोय झाली होती. या पुलाचे काम करावे यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. यानंतर या पुलाच्या कामास सुरुवात झाली होती.  या पुलाचे रविवारी लोकार्पण  करण्यात आले. यावेळी बोलताना  आ.अमोल खताळ म्हणाले की, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले होते. काही वर्षांपूर्वी एका ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा पूल कोसळला होता. त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन महसूल मंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला.  दोन वर्षांपूर्वी, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, या पुलाच्या नव्या कामास मंजुरी मिळाली होती. विशेष म्हणजे, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या नव्या पुलाचे लोकार्पणही झाले, हा एक सकारात्मक योगायोग ठरला असल्याचे आमदार  खताळ यांनी सांगितले. म्हाळुंगी नदीवरील पूल पडल्याने गेल्या चार वर्षापासून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे. आमदार खताळ यांनी दोन वेळा या पुलाची पाहणी करून ठेकेदारांना दर्जेदार कामासाठी सूचना दिल्या होत्या. अल्पावधीत हे बांधकाम पूर्ण करून नागरिकांसाठी पूल खुला करण्यात आला.
 या लोकार्पण सोहळ्याला निलम खताळ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, महायुतीचे ज्ञानेश्वर कर्पे,  शिरीष मुळे, अविनाश थोरात,कैलास लोणारी, कैलास वाकचौरे, रामभाऊ राहणे, संदीप देशमुख, सागर भोईर, अल्पना तांबे, उषा कपिले, कांचन ढोरे, कावेरी नवले, दिपाली वाव्हळ, रेखा गलांडे, पुनम अनाप, दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, लखन घोरपडे, सौरभ देशमुख, शौकत  जहागीरदार, कैलास कासार, संपत गलांडे, राहुल भोईर, शशांक नामन, सुशील शेवाळे, मुजफ्फर जहागीरदार, सुयोग गुंजाळ, तुषार ठाकूर, या पुलाचे बांधकाम करणारे ठेकेदार राऊत, अजित गुंजाळ,  गौतम शाह, शैलेश मंडलिक,  जमशेद मिर्झा यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील साईनगर पंपिंग स्टेशन घोडेकर मळा भागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने या भागात विकासाची कामे आणखी गतीने होणार आहेत. नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, आम्ही त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी यावेळी दिला.
Visits: 123 Today: 1 Total: 1106299

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *