मंत्री विखेंच्या वाढदिवसानिमित्त लाभार्थ्यांना वाळूचे वाटप 

नायक वृत्तसेवा, आश्वी 
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सुमारे ७० घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार सुमारे ३५० ब्रास वाळू मोफत वाटपाचा उपक्रम ग्रामपंचायतीने राबवल्याने लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीला धन्यवाद दिले.
अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर करुन कोणतेही सत्कार समारंभ आयोजित न करता सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले होते. त्या नुसार आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच  अलका बापुसाहेब गायकवाड, उपसरपंच बाबा भवर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे,तलाठी सुर्यकांत रणशुर, ओमप्रकाश गाडेकर, मंडलअधिकारी अनिल आव्हाड यांच्या मार्फत संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, संगमनेर तहसिलदार, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे रितसर पत्रव्यवहार करत आश्वी खुर्द येथील शासकीय वाळु डेपोतील शिल्लक वाळु  शासनाच्या वाळु धोरणानुसार प्रत्येक घरकुल लाभार्थांला ५ ब्रास वाळू मोफत मिळावी अशी मागणी प्रस्ताव देऊन केली होती. तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री व पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील माजी खा.सुजय विखे पाटील जि.प.माजी अध्यक्षा  शालिनी विखे पाटील यांच्याकडेही या संदर्भात पाठपुरावा केला होता,  त्यांनी यात विशेष लक्ष्य घातल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे रविवारी  ना. विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळु वाटपाचा शुभारंभ सरपंच  अलका गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजप महिला जिल्हा अध्यक्षा कांचन राजेंद्र मांढरे, विखे पाटील कारखान्याचे संचालक ॲड.अनिल भोसले, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्विय सहाय्यक बापुसाहेब गायकवाड, दुध संस्थेचे अध्यक्ष मकरंद गुणे, उपसरपंच बाबा भवर, सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड, मोहीत गायकवाड, ग्रा.प.सदस्य संजय भोसले, सोपान सोनवणे, कल्पना क्षिरसागर, दुध संस्थेचे संचालक विजय गायकवाड, रमेश सिनारे, अशोक भोसले, कैलास गायकवाड, माजी ग्रा.प.सदस्य संतोष भडकवाड, दिपक सोनवणे, इन्नुस सय्यद इसुब शेख सह मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थी उपस्थित होते.
आश्वी खुर्द ग्रा.प. कर्मचारी, तलाठी कार्यालयातील कर्मचारी एकत्र येऊन स्थानिक ग्रामस्थांचे ट्रॅक्टर अल्प भाडे तत्वावर घेऊन ५ ब्रास वाळु पुढील दोन ते तिन दिवसांत लाभार्थीच्या घरी पोहच करतील अशी माहिती सरपंच अलका गायकवाड यांनी यावेळी दिली.
Visits: 109 Today: 1 Total: 1107906

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *