तळेगाव दिघेत नेत्ररोग निदान शिबीर उत्साहात

नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे
राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत समता फाऊंडेशन आणि ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्ररोग निदान शिबीर उत्साहात पार पडले. सदर शिबिरात १२० रुग्णांची मोफत नेत्ररोग तपासणी करण्यात आली.

तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी नेत्ररोग तपासणी शिबीर पार पडले. प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे व प्रभारी सरपंच मयुर दिघे यांच्या हस्ते नेत्ररोग तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, डॉ. बी. एस. डामसे, डॉ. निलेश माने, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. एम. के. संगारे, राजेश दिघे, अतुल कदम, गोरख इल्हे, विकास दिघे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

सदर शिबीरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया शिबिरात १२० रुग्णांनी सहभाग नोंदवला. सदर शिबिरात नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. एम. के. संगारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. डामसे, डॉ. निलेश माने यांनी नेत्र रुग्णांची मोफत तपासणी केली. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित मोफत नेत्ररोग निदान शिबीर उत्साहात पार पडले.

Visits: 74 Today: 1 Total: 1108551
