रक्तदानाची क्षमता हे माणसाला मिळालेले वरदान ः मालपाणी दामोदर मालपाणी यांचा स्मृतीदिन; सव्वाशे रक्तपिशव्यांचे संकलन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
रक्तदानाची क्षमता हे माणसाला लाभलेले वरदान आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविता येतात आणि कितीतरी परिवारांना सावरणे शक्य होते. रक्तदानाला आपल्या संस्कृतीत सर्वोच्च दानाचे महत्त्व प्राप्त असून त्याला जीवनदान म्हणूनही ओळखले जाते. आपल्या उद्योग समूहावर नीति आणि सदाचाराचे संस्कार करणार्‍या दामोदरशेठ यांच्या प्रत्येक स्मृतीदिनी रक्तदानाचा महायज्ञ त्यांच्या स्मृतींना खर्‍याअर्थी उजाळा देणारा असल्याचे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी केले.

मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय दामोदर मालपाणी यांच्या 48 व्या स्मृतीदिनानिमित्त अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापक रमेश घोलप, शिवाजी आहेर, अर्पण रक्तपेढीच्या डॉ.मधुरा पाठक, डॉ.जैन व प्रमिला कडलग आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मालपाणी म्हणाले की, स्वर्गीय दामोदर मालपाणी दानशूर म्हणून संगमनेरकरांना परिचित होते. त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर उपक्रम करणे हे त्यांच्या दानशूरतेला अतिशय साजेसे आहे. नवनवीन संशोधनामुळे रक्तदान अधिक महत्त्वाचे झाले आहे. अत्याधुनिक वैद्यकशास्त्रामुळे रक्तातील विविध घटक वेगळे करून एकाच रक्ताच्या पिशवीतून अनेकांना त्याचा लाभ होवू शकतो. विशेष म्हणजे रक्तदानाला धनाची नव्हेतर फक्त मनाची श्रीमंती आवश्यक असते असे सांगत मालपाणी उद्योग समूहातील कामगार सहकारी स्वयंस्फूर्तीने वर्षानुवर्षे रक्तदानाचा हा उपक्रम राबवतात. या उपक्रमातून स्वर्गीय दामोदरजींच्या कार्याचेच दर्शन घडते असेही त्यांनी सांगितले.

डॉ.पाठक यांनी रक्तदानाचे फायदे शास्त्रशुध्द पद्धतीने समजावून सांगितले. रमेश घोलप यांनी प्रभावी बोधकथा सांगत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अ‍ॅड. संतोष राऊत यांनी केले. यावेळी रवींद्र कानडे, देवदत्त सोमवंशी, विशाल बाजपेयी, मनोज हासे, मंगेश उनवणे, प्रदीप कानवडे, अनिल दणदणे, गौरव काथे, मुरारी देशपांडे, किशोर वडनेरे, संतोष गुंजाळ, संतोष बुर्‍हाडे, विनायक भोईर, प्रशांत कर्पे, सीए. तुषार कटारिया, बाळासाहेब हासे, सीए. कल्पेश दरक, नीलेश सदावर्ते, विशाल झांबरे आदी उपस्थित होते. या शिबिरातून 127 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

Visits: 3 Today: 1 Total: 27399

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *