कत्तलखान्यावर छापा; लाखोचा मुद्देमाल जप्त! एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई, दोघे अटकेत
नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
गोवंश जनावरांची बिनदिक्कतपणे कत्तल करणाऱ्या कत्तलखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकत दोन कसायांना जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. माणिक चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेऊर बायजाबाई गावातील मुनाफ चाँद शेख आणि मुजफर चाँद शेख यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील गोठ्यात कत्तल केलेले गोवंशीय मांस तसेच कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशीय जनावरे निर्देयतेने डांबून ठेवलेबाबत मिळालेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकला. येथून सलमान अजीज शेख, वय २५ वर्षे, रा. घासगल्ली, कोठला, ता. जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेतले. सलमान अजीज शेख याचेकडे चौकशी केली असता त्याने इकलास शेख, मुनाफ चाँद शेख, मुजफर चाँद शेख, अस्लम खलील कुरेशी अशी त्याच्या साथीदारांची नावे सांगितली. घटनास्थळावरुन पोलिसांनी ५०० किलो गोवंशीय मांस, पाच गोवंशीय जातीची जनावरे, वापरण्यात आलेल्या गाड्या तसेच कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकुण ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई एम.आय.डी.सी. पोलीस करत आहेत. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस उपनिरीक्षक देविदास भालेराव, पोलीस उपनिरीक्षक अनिल आढाव, स.फौ. बाबासाहेब काळे, स.फौ. राकेश खेडकर, पो.हे.कॉ. रमेश थोरवे, पो.हे.कॉ. राजु सुद्रिक, पो. कॉ भगवान वंजारी, पो.कॉ. सुरेश सानप, पो.कॉ. ज्ञानेश्वर तांदळे, पो.कॉ. अक्षय रोहोकले, पो.कॉ. पवार यांनी केली.

Visits: 84 Today: 2 Total: 1099534
